करुणा उपचार आणि पुनर्वसन- व्यसनमुक्तीकडे वाटचाल

करुणा उपचार आणि पुनर्वसन- व्यसनमुक्तीकडे वाटचाल

Published On: December 17, 2025

**करुणा उपचार आणि पुनर्वसन- व्यसनमुक्तीकडे वाटचाल* * दारू व्यसनमुक्तीसाठी डॉ. बालकृष्ण ठाकरे यांचे अद्वितीय आणि समाजहिताचे कार्य डॉ. राजेंद्र तातू ननावरे पल्मोनोलॉजिस्ट व छाती रोगतज्ज्ञ माजी वैद्यकीय अधीक्षक – शिवडी ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटल स्पेशालिटी मेडिकल कन्सल्टंट – टीबी व श्वसनरोग Fellowship in Pulmonology | PhD Scholar – Tuberculosis (Kennedy University, USA) दारूचे व्यसन हे आजच्या समाजातील सर्वात धोकादायक आणि विनाशकारी व्यसनांपैकी एक आहे. आरोग्य, कुटुंब, अर्थकारण, चारित्र्य आणि मानवी मूल्ये नष्ट करणारी ही अदृश्य आग हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करते. अशा गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हॉस्पिटल अँड रिहॅबिलिटेशन रिसर्च सेंटर येथे मी डॉ. बालकृष्ण ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या कार्याचा जवळून अनुभव घेतला. डॉ. ठाकरे यांचे कार्य हे अत्यंत समर्पित, संवेदनशील आणि समाजहिताचे आहे. त्यांचा स्पष्ट संदेश— “दारू व्यसनमुक्ती हेच आमचे ध्येय” केवळ एक घोषवाक्य नाही, तर असंख्य रुग्ण आणि कुटुंबांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी जीवनयात्रा आहे. त्यांच्या केंद्रात २४ तास हेल्प लाईन, आयुर्वेदिक पंचकर्म, आयसीयू सुविधा, तसेच वैज्ञानिक पद्धतीवर आधारित Alcoholism Rehabilitation Therapy (ART) उपलब्ध आहे. मानसिक, शारीरिक आणि सामाजिक पुनर्वसनाचा एकत्रित, समतोल आणि मानवी दृष्टिकोन तेथील प्रत्येक रुग्णास नवे जगण्याचे सामर्थ्य देतो. दारूचे व्यसन हे २०० पेक्षा अधिक आजारांचे मूळ कारण आहे— लिव्हर सिरोसिस, कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेहातील गुंतागुंत, मानसिक आजार, आत्महत्या, अपघात आणि कुटुंबांत विघटन यामागे दारू व्यसन मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी ३० लाखांहून अधिक मृत्यू केवळ दारूच्या व्यसनामुळे होतात—ही अतिशय गंभीर मानविक शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकरे यांचे कार्य हे आरोग्यसेवा, सामाजिक न्याय आणि मानवी करुणेचे सुंदर उदाहरण आहे. व्यसनातून बाहेर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी ते ज्या प्रकारे वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक आधार देतात, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी निवडलेला श्लोक त्यांच्या मिशनचा आत्मा सांगतो— “कामये दुःखतप्ताणां प्राणिनाम् अर्तनाशनम्।” (“मला राज्य, स्वर्ग किंवा पुनर्जन्म नको; दुःख भोगणाऱ्या जीवांचे दु:खनाशनच माझे ध्येय आहे.”) मी त्यांना माझे पुस्तक ‘Breath and Beyond’ भेट दिली आणि त्यांच्या कार्यातील समर्पण, करुणा आणि सकारात्मक दृष्टीकोन पाहून मनापासून प्रभावित झालो. डॉ. बालकृष्ण ठाकरे यांचे दारू व्यसनमुक्तीसाठीचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. अशा सेवाभावी कार्याला संपूर्ण समाजाकडून आदर व प्रशंसा मिळाली पाहिजे.

Latest Articles